¡Sorpréndeme!

Special Reports On Ambadas Danve Vs Chandrakant Khaire | दानवे-खैरेंमधलं कोल्ड वॉर कधी संपणार?

2025-04-14 3 Dailymotion

Special Reports On Ambadas Danve Vs Chandrakant Khaire | दानवे-खैरेंमधलं कोल्ड वॉर कधी संपणार? 
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वादावर एखादी सिरीज निघेल. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं छत्रपती संभाजीनगर ठाकरेंच्या हातून कधीच गेलाय. मात्र तरी देखील या दोघांमधील वाद काही संपवायचं नाव घेत नाही... दोघेही निवडणुकीच्या पूर्वी एकमेकांना पेढा भरवतात आणि निवडणुकीसमताच एकमेकांचे वाभाडे काढतात या दोघांच्या वादाचा नवा अंक गेल्या काही दिवसांपासून सुरू झालाय.. 
चंद्रकांत खैरे...  आणि अंबादास दानवे...  छत्रपती संभाजीनगरमधले ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन महत्वाचे नेते   कधी एकमेकांना पेढा भरवताना दिसतात   तर कधी एकमेकांचे वाभाडे काढताना...  दोघंही एकमेकांसमोर आले की मित्र  आणि बाजूला झाले की शत्रू...  खैरेंचा लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव झाला  यातल्या पराभवाला खैरेंनी प्रत्येकवेळी दानवेंना जबाबदार धरलंय  आणि आता त्यांनी विरोधात असलेल्या संदीपान भुमरेंसोबत दानवेंनी सेटलमेंट केल्याचा आरोप केलाय....  बाईट - चंद्रकांत खैरे, माजी खासदार  खैरे आणि दानवेंमधलं वैर इतकं आहे  की पक्षाची घडी विस्कटलेली असतानाही  दोघंही आपापले कार्यकर्ते घेऊन वेगवेगळी आंदोलनं करतायत...  संभाजीनगरमध्ये दानवेंनी आयोजित केलेल्या एका मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत खैरेंचं नावंही नव्हतं...  याचीही मोठी चर्चा रंगली... त्याचाही खैरेंनी चांगलाच समाचार घेतला...